Friday, December 30, 2011


During this year….



Thanks to those who hated me..

             





They made me stronger person..




Thanks to those who loved me..





                                      



 They made my heart bigger..



             





Thanks to those who were worried about me..










They let me know that they actually cared..







Thank to those who left me..








They made me realize that nothing lasts forever..









Thanks to those entered my life..



                                    



They made me who I’m  today.

                        
           
Just want to thank you for being there in my life whatsoever I might have meant to you…



                                                            



                Wish you and your loved ones a wonderful and a successful year ahead….


HAPPY  NEW YEAR J

Tuesday, October 4, 2011

मी फसलो म्हणूनी


या कवितेविषयी आधी थोडंसं सांगते …की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -
मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी
ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते
आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले
ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनो

आज सकाळ पासून  वातावरण जरा ढगाळ होत..
माझ मनही जरा खिन्न होत ..
त्यात एक गाण कानावर पडल ..

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनो ।।धृ।।
न मैं तुम से कोई उम्मीद रख्खूं दिलनवाजी की
न तुम मेरी तरफ देखो गलत-अंदाज नजरों से 
न मेरे दिल की धडकन लडखडाए मेरी बातों मे 
न जाहिर हो तुम्हारी कश्‍मकश का राज नजरों से ।।1।।

तुम्हे भी कोई उलझन रोकती है पैश-कदमी से 
मुझे भी लोग कहते है कि ये जलवे पराए है 
मेरे हमराह भी रुसवाइयां3 है मेरे माजी की
तुम्हारे साथ भी गुजरी हुई रातों के साए है ।।2।।

तारुफ़  रोग हो जाए तो उस को भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाए तो उसको तोडना अच्छा
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड दे कर छोडना अच्छा ।।3।।

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनो ।

Thursday, September 8, 2011

मी नाही म्हणत....तू फक्त माझ असाव...

मी नाही म्हणत....तू फक्त माझ असाव...
पण माझ्या जीवनात मात्र तुझ्या खेरीज कुणी नसाव...
मी नाही म्हणत.... तू मलाच आठवावं..
पण तू मात्र सदैव माझ्या स्मरणात रहाव..
मी नाही म्हणत.... तू मला मनात ठेवाव...
पण माझ्या मनी मात्र तूच वसाव...
मी नाही म्हणत....तू माझ्या साठी रडावं....
पण माझी पापणी मात्र तुझ्याच साठी भिजाव....
मी नाही म्हणत.... तू मला प्रेम कराव...
पण कधी तरी तुलाही माझ्याच सारखा प्रेम व्हाव...
मी नाही म्हणत....तू कधी हसू नये....
पण माझ्या साठी हसण्याचे कारण मात्र तूच असाव...
मी नाही म्हणत.... तू मला भेटाव..
पण माझ्या साठी ती भेट मला सुखी करून जाव...
मी नाही म्हणत.... कधी तू माझ्या साठी कविता रचावी...
पण माझी लेखणी तुझ्याच आठवणीत वळावी....
मी नाही म्हणत.... कधी तुला मीच दिसव....
पण मला, डोळे बंद होताच स्मरणात तुझाच चित्र रेखाताव...
मी नाही म्हणत.... कधी तुझी भावना तुझ्या पासन दूर जावी..
पण दुख होईल मला, जर माझी भावना तुला न कळली....
मी नाही म्हणत.... तुझ जगन माझ्यासाठी बदलाव...
पण माझ स्वप्न जगन माझ हे तुझ्या कुशीत पूर्ण व्हाव...
मी नाही म्हणत.... माझ्या भावनान सोबत खेळू नको...
पण माझ तुझ्यावर खरच प्रेम आहे हे तू विसरू नकोस...
मी एवढच म्हणते.... माझ्या प्रेमाची जाणीव व्हावी....
अन पुढच्या जन्मी तरी तु माझा अन मी तुझी बनून यावी...
मी एवढच म्हणते....माझी शेवटची इच्छा तू पूर्ण करावी...
या जन्मी नाही तर पुढल्या जन्मी आपली भेट व्हावी.....

Tuesday, August 23, 2011

आठवतयं का तुला ...

विसरली नसशीलच तू ती खुळावलेली वेळ
ऐन भरात आला होता उनपावसाचा खेळ
त्या स्वप्निल चांदण्यात मी उभा पेटलो होतो
आडवयातल्या वाटेवर जेव्हा चोरुन भेटलो होतो
आठवतायंत का तुला आपल्या नजरांमधील कोडी


प्रश्न होते खूप पण वेळ होती थोडी
माझ्यापेक्षा तू माझ्या शब्दांवर भाळली होतीस
मनात होती वादळं पण अबोली माळली होतीस
आठवतायेत का तुला ते धुंदावलेले गंध
शपथांच्या खेळातले ते लोभसवाणे छंद

एकांतीचे शब्द शांततेनी खोडले होते
जसे मेघांनी ग्रीष्माचे संसार मोडले होते
मग एकदा असाच तू केला होतास फोन
मौनाच्या पडद्याआड रडलं होतं कोण?

मी रडलो नाहीच फक्त हसलो खिन्न
व्यथा होती एकच पण कथा होत्या भिन्न
पत्त्यांचा बंगलाच तो कधीतरी पडणार
एक खड्डा बुजवायला दुसरा खड्डा पडणार
आता जपून ठेव हे आयुष्यभराचं वाक्य
नियतीचं प्रेमाशी जमत नाही सख्य

अक्षता झेलत झेलत संसारात रमायचं
टाचांना कुरवाळत नभाशी बोलायचं
मळभ होईल दूर विरून जातील मेघ
आकाशीचे ग्रह घेतील पुन्हा वेग

दिवस असे सरून गेले तुटलं होतं अंतर
तात्पर्य नसतं अश्या कथेला कधीच नसतो 'नंतर'
हळद मेंदी, सनई तिघी एकत्र नांदल्या
कवितेनं व्यथा सा-या सहीपाशी सांडल्या ...!


आपलंही कुणी असावं...

ह्या खांद्यावर डोकं ठेऊन तिला रडावसं वाटावं
ज्या स्वप्नांमध्ये माझ्या सगळ्या रात्री जगतात
त्या स्वप्नांमध्ये हरवून तिलाही जगावंसं वाटावं....
माझे आसू पुसून तिने आमच्या सुखात हसव..
कधीतरी वाटत यार आपलंही कुणी असावं...

छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खोटं खोटं चिडाव पण ...
भेटीनंतर निघते म्हणताना तिचा पाऊल अडावं
बाकी सगळ्या जगाचा पडेलच विसर तेव्हा...
तिने माझा प्रेमात अगदी आकंठ बुडावं...
ह्या छोट्याशा स्वप्नानं एकदाचं खरं व्हाव ....
नेहमीचा यार वाटत..... आपलंही कुणी असावं...


==============================================


मनाला एकदा आसेच विचारले
का इतका तिच्यात गुंततो ?
नाही ना ती आपल्यासाठी
मग का तिच्यासाठी झुरतो ?

कळत नाही तुला
त्रास मला भोगावा लागतो
आश्रूं मधे भिजून भिजून
रात्र मी जागतो.

मी म्हटले मनाला
का स्वप्नात रमतो ?
तिच्या सुखा साठी तू
का असा दुखात राहतो ?

मन म्हणाले
प्रेम तेव्हा सुरू होते जेव्हा
आपण स्वता ला विसरतो
सार काही तिच्यासाठी
ईतकेच मनाला समजावतो.

==========================================

क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप्रमाणे गळते

तर कधी फ़ुलाप्रमाणे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते

===========================================


Thursday, August 18, 2011


आज आभाळ असं बरसावं
हात पसरून त्याला कवेत घ्यावं
मिठीत भिजलेला स्पर्श त्याचा
माझ्या लाजण्यानं त्यानं शहारावं
आज आभाळ असं बरसावं .......


वारयानेही व्हावं ओलेतं ओलं
कडाडून विजेनं माझ्यावर जळावं
तिला करेन टुकटुक भान हरपावं
आज आभाळ असं बरसावं .......

प्रणयाची धुंदी क्षितिजावर चढावी
ढगान्ची दुलई अंगावर घ्यावी
सुर्याने ढगांआडून डोकावून बघावं
आज आभाळ असं बरसावं .......

उगाचच मनाने हळवं व्हावं
अश्रुंचं ओलेपण अलगद ल्यावं
इवलंसं तळं तळव्यावर घ्यावं
आज आभाळ असं बरसावं .......

Wednesday, August 17, 2011

पिंपळपान

काही माणसं ही
पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी मनाच्या
पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात.





मनातील भाव माझ्या नाही मी लपवू शकलो
कारण मी होतो तुझ्या प्रेमामध्ये पडलो,
प्रेमामध्ये त्या पडुन आपले सर्व भान विसरलो
मनीचे भाव माझ्या तु कसे जाणलेस?
प्रेम तुझेही आहे माझ्यावर हे तु सांगीतलेस
आयुष्यभर साथ देण्याचे वचन तु मला दिलेस,
आयुष्यात मला हवेहवेसे वाट्णारे खरे प्रेम मात्र तु मला दिलेस.

नाही सोडणार कधी एकटी हेच आज मी तुला सांगत आहे,
मी प्रेम करतो तुझ्यावर भरमसाठ हेच तुला समजावत आहे.