आज आभाळ असं बरसावं
हात पसरून त्याला कवेत घ्यावं
मिठीत भिजलेला स्पर्श त्याचा
माझ्या लाजण्यानं त्यानं शहारावं
आज आभाळ असं बरसावं .......
वारयानेही व्हावं ओलेतं ओलं
कडाडून विजेनं माझ्यावर जळावं
तिला करेन टुकटुक भान हरपावं
आज आभाळ असं बरसावं .......
प्रणयाची धुंदी क्षितिजावर चढावी
ढगान्ची दुलई अंगावर घ्यावी
सुर्याने ढगांआडून डोकावून बघावं
आज आभाळ असं बरसावं .......
उगाचच मनाने हळवं व्हावं
अश्रुंचं ओलेपण अलगद ल्यावं
इवलंसं तळं तळव्यावर घ्यावं
आज आभाळ असं बरसावं .......
हात पसरून त्याला कवेत घ्यावं
मिठीत भिजलेला स्पर्श त्याचा
माझ्या लाजण्यानं त्यानं शहारावं
आज आभाळ असं बरसावं .......
वारयानेही व्हावं ओलेतं ओलं
कडाडून विजेनं माझ्यावर जळावं
तिला करेन टुकटुक भान हरपावं
आज आभाळ असं बरसावं .......
प्रणयाची धुंदी क्षितिजावर चढावी
ढगान्ची दुलई अंगावर घ्यावी
सुर्याने ढगांआडून डोकावून बघावं
आज आभाळ असं बरसावं .......
उगाचच मनाने हळवं व्हावं
अश्रुंचं ओलेपण अलगद ल्यावं
इवलंसं तळं तळव्यावर घ्यावं
आज आभाळ असं बरसावं .......
No comments:
Post a Comment