Tuesday, October 4, 2011

मी फसलो म्हणूनी


या कवितेविषयी आधी थोडंसं सांगते …की हातामधून हात सुटून जातो, पण जे काही थोडे क्षण एकमेकांच्या वाट्याला आलेले असतात, ते मात्र मनामध्ये अमर होऊन रहातात. आणि या क्षणांकडे बघून जे म्हणावसं वाटतं, ती ही कविता -
मी फसलो म्हणूनी हसूदे वा चिडवूदे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी
ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते
आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले
ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनो

आज सकाळ पासून  वातावरण जरा ढगाळ होत..
माझ मनही जरा खिन्न होत ..
त्यात एक गाण कानावर पडल ..

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनो ।।धृ।।
न मैं तुम से कोई उम्मीद रख्खूं दिलनवाजी की
न तुम मेरी तरफ देखो गलत-अंदाज नजरों से 
न मेरे दिल की धडकन लडखडाए मेरी बातों मे 
न जाहिर हो तुम्हारी कश्‍मकश का राज नजरों से ।।1।।

तुम्हे भी कोई उलझन रोकती है पैश-कदमी से 
मुझे भी लोग कहते है कि ये जलवे पराए है 
मेरे हमराह भी रुसवाइयां3 है मेरे माजी की
तुम्हारे साथ भी गुजरी हुई रातों के साए है ।।2।।

तारुफ़  रोग हो जाए तो उस को भूलना बेहतर
ताल्लुक बोझ बन जाए तो उसको तोडना अच्छा
वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन
उसे इक खूबसूरत मोड दे कर छोडना अच्छा ।।3।।

चलो इक बार फिर से अजनबी बन जाएं हम दोनो ।